देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फॅकल्टी हॅकेथॉनचा अभिनव उपक्रम

Event Details

March 20,2022

3:00 pm - 6:00 pm

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये फॅकल्टी हॅकेथॉनचा अभिनव उपक्रम

देविगरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिउरकर यांच्या संक्लपनेतुन साकारलेली फॅकल्टी हॅकेथॉन (प्रोजेक्ट कॉम्पीटीश्न) दि 20 मार्च 2022 रोजी पार पडली. हॅकेथॉन म्हणजे एकप्रकारची प्रोजेक्ट कॉम्पीटीशन असुन यामध्ये भाग घेणा-या व्यक्तीनी सामाजिक बांधिलकीमधुन समाजासाठीचे जे प्रश्न्‍ असतात ते साध्या पध्दतीतने सोउविण्यास मदत करणे होय. यामध्ये सॉप्टवेअर व हार्डवेअरच्य साहयाने इंड्रस्टीचे तसेच सर्वसाधारण लोकांचे प्रश्न सोडवता येतात. साधारणपणे तीन स्टाफ मेबर मिळुन एक सामाजिक प्रश्न घेतला जातो या स्टाफ हॅकेथॉनव्दारे इन्हेाव्हेव्टीव आयडीया तयार होते व इंजिनिअरींग नॉलेजचा वापर होऊन ते प्रश्न सोडविण्यास मदत होते. या प्रश्नामध्ये जसे की घरगुती नळाला पाणी आल्यास घंटी वाजेल व पाण्याची बजत होईल, खराब प्लास्टीक सामग्रीचा वापर बांधकामाध्ये करता येतो, सध्याची कर्करोगाची व्याप्ती बघता सध्याची सि.टी.स्कॅन मशिन ही मेमोग्राफी व सि. टी. स्कँन या दोन्ही साठी उपयोगी पडेल हे तंत्र विकसित केले आहे., पावसाळयातील पाणी जमीनीमध्ये मुरविणे इ. या अभिनव उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला साधारणपणे 16 प्रोजेक्ट व 48 प्राध्यापकांनी विविध समाज उपयोगी प्रकल्प तयार केले. प्रामुख्यांने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग, सिव्हिल इंजिनिअरींग, मॅकेनिकल इंजिनिअरींग, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरींग तसेच बी.एस.एच. विभागाच्या प्राध्यापकांनी प्रकल्र्प साधर केले. या प्रोजेक्ट कॉम्पीटीशनसाठी संजय टेक्नॉलॉजीचे एम. डी. श्री. प्रसाद कोकीळ, टुलटेक टेक्नॉलॉजीचे एम.डी. श्री. सुनिल किरदत्, जिंगल टुल्सचे एम. डी. श्री. संदीप पाठक, एस.एस. कन्ट्रोल्सचे एम.डी श्री. सुरेश तोडकर तसेच पवना गोयम ॲटो प्रा. लि. चे चिफ ऑपरेटींग ऑफिसर श्री. अमित अग्रवाल यांनी सर्व प्रोजेक्टचे परीक्षण केले.

या कार्यक्रमासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. आ. श्री. सतीश चव्हाण, उपाध्यक्ष श्री. शेख सलीम शेख अहमद कार्यकारीणी सदस्य् श्री. विश्वास येळीकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फॅकल्टी हॅकेथॉनचे समन्व्यक डॉ. आर. एम. औटी, सदस्य् प्रा. किरण बनसोडे, डॉ. दुर्गा धर्माधिकारी, प्रा. एस. पी. निरखे, प्रा. प्रमोद भालेराव आणि प्रा. उदय ताकटे यांनी परीश्रम घेतले.

या वेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिउरकर, विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, प्रा. संजय कल्याणकर, प्रा. प्रकाश तौर, डॉ. गजेंद्र गंधे, प्रा. रुपेश रेब्बा, प्रा. अच्युत भोसले, प्रा. अमरसिंह माळी व सर्व प्राध्यापकांची उपस्थीती होती